मध्य रेल्वे
*कधी- रविवार, २२ मार्च, सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५
कुठे- कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर
परिणाम- सकाळी १०.४७ ते दुपारी ३.०४ या वेळेत अप धिम्या आणि अर्धजलद उपनगरी गाडय़ा कल्याण ते ठाणे या दरम्यान अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाकुर्ली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा स्थानकांवर या गाडय़ा थांबणार नाहीत. या स्थानकांतील प्रवाशांना डोंबिवली व ठाणेमार्गे प्रवास करण्याची परवानगी .
सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून डाऊन जलद दिशेने जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांना घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबा देण्यात येणार आहे.
हार्बर रेल्वे
*कधी- रविवार, २२ मार्च, सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०
कुठे- कुर्ला ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अप हार्बर मार्ग आणि वडाळा रोड ते माहीम अप आणि डाऊन मार्ग
परिणाम- सकाळी १०.२० ते दुपारी ३.३३ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वांद्रे, अंधेरी तसेच सकाळी १०.४० ते दुपारी ४.१३ या कालावधीत वांद्रे, अंधेरी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ही बंद.
सकाळी ११.०८ ते दुपारी ३.२० या वेळेत अप हार्बर मार्गावरील वाहतूक कुर्ला रेल्वेस्थानकापासून मेन लाइनवरून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडय़ा शीव, माटुंगा, दादर, परळ ते भायखळा या स्थानकांत थांबतील. पुढे भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अप धिम्या मार्गावरून चालविल्या जातील.
हार्बर मार्गावरील वांद्रे, अंधेरी येथील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मेन लाइन किंवा पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बेस्टतर्फे जादा गाडय़ा
*१० मर्यादित- घाटकोपर आगार ते हुतात्मा चौकमार्गे लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला आगार जंक्शन, शीव, महेश्वरी उद्यान, रफी अहमद किडवाई मार्ग, डॉकयार्ड रोड.
*२० मर्यादित- शिवाजीनगर ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक. मार्गे पूर्व द्रुतगती महामार्ग, शीव, महेश्वरी उद्यान, रफी अहमद किडवाई मार्ग, डॉकयार्ड रोड.
*४, ८४ आणि २०१ मर्यादित- माहीम ते अंधेरी. मार्गे स्वामी विवेकानंद मार्ग
पश्चिम रेल्वे (हार्बर मार्ग)   
कधी- रविवार, २२ मार्च २०१५ सकाळी ११.०० ते दुपारी ४.००.
कुठे- अंधेरी ते माहीम जंक्शन अप आणि डाऊन हार्बर मार्ग
परिणाम- हार्बर मार्गावरील सर्व अंधेरी लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.