ख्रिसमस आणि नववर्षांनिमित्त गजबजाणाऱ्या बाजारपेठा आणि त्यात नवनवीन वस्तू खरेदी करण्यासाठी उडणारी ग्राहकांची झुंबड यांचे औचित्य साधत बाजारातील सर्वोत्तम वस्तू, सेवा आणि भरघोस सवलती त्यादेखील बक्षिसांसह मिळवून देणारा लोकसत्ताचा ‘मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ १९ डिसेंबर २०१४ ते ४ जानेवारी २०१५ या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात मुंबई शहर आणि उपनगरांमधील  नामांकित दुकाने सहभागी होणार आहेत.
   खरेदीचा आनंद लुटताना नामवंत कलाकारांना भेटण्याची संधीही मिळणार असून रविवार २१ डिसेंबर रोजी ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेची नायिका तेजश्री प्रधान  ‘लोकसत्ता’च्या वाचकांना दादरच्या वामन हरी पेठे अॅण्ड सन्स, सारी पॅलेस व टोटल स्पोर्ट्स या दुकानांमध्ये दुपारी तीनपासून  भेटणार आहे.
रिजन्सी ग्रुप हे या मुंबई शॉपिंग फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत. त्याशिवाय जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड हे या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक असतील.
रेमंड शॉप हे स्टायलिंग पार्टनर, अंजली मुखर्जी यांचे हेल्थ टोटल हेल्थ पार्टनर, लागू बंधू आणि वामन हरी पेठे प्लॅटिनम पार्टनर असतील. अपना बाजार, पितांबरी आणि दादर येथील ‘पानेरी’ यांच्या सहकार्याने हा महोत्सव होईल. त्याचप्रमाणे ‘वीणा वर्ल्ड’ हे ट्रॅव्हल पार्टनर असतील. तसेच स्लीम अॅण्ड स्लेंडर हे वेल बिइंग पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. त्याशिवाय टोटल स्पोर्ट्स, कॅम्ब्रिज रेडीमेड्स-कुलाबा, राणेज् पर्सेस, रेन्बो गारमेंट्स, रोनाल्ड २ इन वन, विधि ज्वेलर्स, अतुल इलेक्ट्रॉनिक्स, श्री पॅले