रस्ते, पाणीपुरवठय़ासह विविध नागरी सुविधांबाबतचे अनेक प्रकल्प पालिका मुंबईमध्ये राबवत असून या प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच नागरिकांना पालिकेच्या सर्व कामांची माहिती उपलब्ध होणार आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, मलवाहिन्यांचे जाळे विस्तारणे, उद्यानांचे सुशोभीकरण, पर्जन्य जलवाहिन्या सुधारणा, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, रस्ते आणि पदपथांची दुरुस्ती आदी विविध प्रकल्प पालिकेकडून राबविण्यात येतात. प्रकल्प आणि नव्या धोरणांची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येते.

 

तृप्ती देसाई आज हाजी अली दर्गात

मुंबई : हाजीअली दग्र्याच्या मजारजवळ महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी रविवारी हाजीअली दग्र्यात जाऊन दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. देसाईंचे हे पाऊल केवळ श्रेय लाटणारे असून त्यामुळे धार्मिक तेढही निर्माण होऊ शकते असा इशारा महिला प्रवेशासाठी संघर्ष करणाऱ्या ‘हाजी अली सब के लिए’ या संघटनेने दिला आहे. तर, आम्ही केवळ दग्र्यात जाऊन दर्शन घेणार असून मजार परिसरात जाणार नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाने महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला असतानाच हाजी अली ट्रस्ट सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याने महिला प्रवेशावर ६ आठवडय़ांची स्थगितीही दिली असल्याने अशाप्रकारे जाऊन दर्शन घेतल्याने समाजमन दुखावू शकते, असेही संघटनेचे म्हणणे आहे. २०१२ मध्ये हाजी अली ट्रस्टने महिलांना हाजी अली दग्र्यातील मजार परिसरात जाण्यास बंदी घातली होती.