ऐन दिवाळीमध्ये मुंबई महापालिकेतील १० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात चंद्रशेखर चोरे, संध्या नांदेडकर, देविदास क्षीरसागर, पराग मसुरकर, विश्वास शंकरवार आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी प्रशासकीय बाब म्हणून या १० अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या केल्या. ‘एम-पश्चिम’मधील सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांची अतिक्रमण निर्मूलन (पश्चिम उपनगरे), मालमत्ता विभागातील सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर यांची ‘ए’ विभागात, ‘ए’ विभागातील सहाय्यक आयुक्त देविदास क्षीरसागर यांची ‘डी’ विभागात, ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांची ‘के-पश्चिम’मध्ये, ‘के-पश्चिम’चे सहाय्यक आयुक्त विश्वास शंकरवार यांची मालमत्ता विभागात, ‘एल’ विभागातील सहाय्यक आयुक्त हर्षद काळे यांची ‘एम-पश्चिम’मध्ये, ‘एम-पश्चिम’चे प्रशांत सपकाळे यांची ‘एल’मध्ये, ‘एम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय कांबळे यांची ‘एच-पश्चिम’ला, ‘एच-पूर्व’चे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांची ‘एन’ विभागात बदली करण्यात आली. ‘एच-पश्चिम’ विभागातील कार्यकारी अभियंता यांची ‘एच-पूर्व’ विभागात सहाय्यक आयुक्त (प्रभारी) पदावर बदली करण्यात आली आहे.