महापालिकांमधील शिक्षण मंडळांची मुदत संपेपर्यंत त्यांना जीवदान देण्यात आले आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेने संमत केले आहे. शिक्षण हक्क कायदा लागू असून त्यामध्ये शिक्षण मंडळांची तरतूद नाही. त्यामुळे ही मंडळे बरखास्त करणारा अध्यादेश सरकारने काढला होता. त्यावर शिक्षण मंडळांचे पुनरुज्जीवन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे मुदत संपेपर्यंत मंडळे कार्यरत ठेवण्याबाबत विधेयकात तरतूद करण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर ती अस्तित्वात येणार का, याबाबत सध्यातरी प्रश्न चिन्ह आहे. ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाची मुदत संपल्याने त्याचे सदस्य हवालदिल झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन मुदतवाढीची विनंती केली.