मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना या मुखपत्रातून  मांडले आहे.
मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे, तेव्हाच मुस्लीम व्होट बॅकिंगचं राजकारण थांबेल.  मुस्लीम ‘व्होट बँक’ हा आता चिंतेचा तितकाच डोकेदुखीचा विषय बनला. मुसलमानांचे दु:ख, दैन्य, अज्ञानाच्या नावाखाली प्रत्येक जण या ‘व्होट बँके’चेच राजकारण करीत असतो. कधीकाळी मुस्लीम मते ही कॉंग्रेसची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी संपली. त्यामुळे आपल्याविरोधात ‘मुस्लीम’ मते खाणारा उमेदवार उभा राहू नये यासाठी ‘सेक्युलर’ म्हणवून घेणारा प्रत्येक उमेदवार शर्थ करीत असतो व त्यासाठी तो सौदेबाजी करतो, असे राऊत यांनी म्हटले आहे. मतांचे राजकारण आणि सौदेबाजी रोखण्यासाठी या समाजाचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला हवा, अशी मागणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा केली होती, अशी आठवणही राऊत यांनी या सदरात केली आहे. मुस्लिम मतांचा अधिकार काढून घेतल्यास धर्मनिरपेक्षवाद्यांचे मुखवटे गळून पडतील, असे सांगत राऊत यांनी ओवेसी बंधुंचा सापाची पिल्ले असा उल्लेख केला आहे.