नागपाडय़ाच्या नयानगर येथून बेपत्ता झालेल्या तीन मुलांपैकी दोन मुली वाराणसी येथील बालगृहात असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांना घेण्यासाठी नागपाडा पोलिसांचे एक पथक वाराणसीला रवाना झाले आहे. मात्र, या दोन्ही मुलींचा भाऊ अद्याप बेपत्ता आहे. मुलींकडूनच त्यांच्या भावाबद्दल माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. कल्सुम मोहम्मद झुबेर खान (६) तरन्नुम गुलाम रसूल शेख (६) अशी सापडलेल्या मुलींची नावे आहेत. गुलफाम ऊर्फ लड्डन हा अद्याप बेपत्ता आहे. रविवारी सायंकाळी नागपाडय़ातून हे तिघेही बेपत्ता झाले होते.
‘आम्ही खूप दूर जातोय!’
नागपाडा पोलिसांनी या मुलांना शोधण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती आणि अहोरात्र या मुलांचा तपास करण्यात येत होता. बुधवारी मुंबई सेंट्रलजवळच्या रस्त्यावरील एका सीसीटीव्ही चित्रीकरणात तीन मुले चालताना आढळून आल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी या चित्रीकरणाची तपासणी केली. या मुलांच्या पालकांची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली होती. आपले कोणाशीही वैर नसताना कोणी आमच्या मुलांना का पळवून नेले, असा प्रश्न त्यांना पडला. हे कुटुंबिय अत्यंत गरीब आहेत.
नागपाडय़ातील घर सोडून गेलेली मुले अद्याप बेपत्ता