गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा शुक्रवारी राज्य सरकारकडून करण्यात आली. मुंबईच्या पालकमंत्रीपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर मुंबई उपनगराच्या पालकमंत्रीपदी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदी अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांची तर ठाण्याच्या पालकमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी दोन दिवसांत पालकमंत्र्यांचे नावे जाहीर केली जातील, असे सांगितले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.जिल्हा आणि पालकमंत्रीमुंबई - सुभाष देसाईमुंबई उपनगर - विनोद तावडेठाणे - एकनाथ शिंदेपुणे - गिरीश बापटपालघर - विष्णू सावराबीड-लातूर - पंकजा मुंडेसांगली-कोल्हापूर - चंद्रकांत पाटीलरायगड - प्रकाश मेहतापरभणी-नांदेड - दिवाकर रावतेरत्नागिरी - रवींद्र वायकरनाशिक - गिरीश महाजनजळगाव-बुलढाणा - एकनाथ खडसेसिंधुदुर्ग - दीपक केसरकरऔरंगाबाद - रामदास कदमगडचिरोली - अंबरीश आत्रामवर्धा-चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार भंडारा-उस्मानाबाद - डॉ. दीपक सावंतगोंदिया - राजकुमार बडोलेजालना - बबनराव लोणीकरहिंगोली - दिलीप कांबळेअहमदनगर - राम शिंदेसातारा - विजय शिवतारेसोलापूर - विजय देशमुखअमरावती - डॉ. प्रविण पोटेअकोला-वाशिम - डॉ. रणजित पाटीलयवतमाळ - संजय राठोडनागपूर - चंद्रशेखर बावनकुळे