मुंबईच्या विकास आराखडय़ातील आरक्षणे बदलण्यासाठी शिवसेना नेतृत्वाच्या निकटवर्तीयांनी काही बिल्डरांना दूरध्वनी केले होते, असा आरोप करीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. विकास आराखडय़ात हवी तशी आरक्षणे ठेवण्याकरिता ‘मातोश्री’वरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळच्यांनी काही बिल्डरांना फोन केले होते. याचाच अर्थ या साऱ्या भ्रष्टाचारात शिवसेनेचे नेतृत्व सहभागी आहे. मुंबईचा वादग्रस्त विकास आराखडा रद्द झाला की त्यात दुरुस्ती करण्यात येणार ही संदिग्धता दूर करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप निरुपम यांनी
केला.  मात्र निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी फेटाळून लावले.