वर्षभरातील चर्चिल विषय आणि व्यक्तींचा अहवाल प्रसिद्ध 

१४० अक्षरांमध्ये व्यक्त होण्याची मुभा देणाऱ्या ‘ट्विटर’ या माध्यमावर वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नोटाबंदी यांच्यासह बॉलीवूड अभिनेत्यांमधील ‘खाना’वळींचीच चलती होती.  वर्षभर ट्विटरवर भारतातील कोणते विषय चर्चेत होते, कोणत्या व्यक्तींना सर्वाधिक ट्विटर अनुयायी आहेत, कोणत्या विषयाचे ट्रेंड्स होते याचा अहवाल ट्विटर आज प्रसिद्ध करणार आहे. ‘लोकसत्ता’ला हा अहवाल उपलब्ध झाला आहे.   ट्विटरने खास #ळँ्र२ऌंस्र्स्र्ील्ली िहा हॅशटॅग तयार केला आहे. याद्वारे हा अहवाल पाहता येईल. या वर्षांत भारतीय देशातील घडामोडींबरोबरच जागतिक घडामोडींबाबत सर्वाधिक व्यक्त झाले. राजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रात सर्वाधिक ट्वीट करण्यात आले.

ट्िवटरवरील सर्वात प्रभावी घटना

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला चलन निश्चलनीकरण योजना जाहीर केली आणि बहुतांश भारतीयांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले. ही घोषणा झाल्यानंतर २४ तासांच्या आत तब्बल ६ लाख ५० हजार ट्वीट्स झाले. यानंतर या विषयावर पुढील काही आठवडे काही लाख ट्वीट्स येत राहिले.
  2. रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये महिलांनी मिळवलेल्या यशाबाबत ५ ते २१ ऑगस्ट या कालावधीत लाखो ट्वीट्सची नोंदणी करण्यात आली. या संपूर्ण कालावधीत #फ्र2016 हा हॅश टॅग सतत ट्रेंडिंग होता.
  3. टी-२०च्या विश्व चषकादरम्यान भारत आणि पाकिस्तानदरम्यान १९ मार्च रोजी झालेल्या सामन्याच्या वेळात ११ लाख ट्वीट्स करण्यात आले. या ट्वीटच्या संख्येने यापूर्वीचा आशिया चषक मालिकेतील भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान झालेल्या ६ लाख ७० हजार ट्वीट्सचा विक्रम मोडला.
  4. क्रीडा आणि राजकारणाबरोबरच यंदा ट्वीटवर दिल्ली येथील प्रदूषणावरही खूप चर्चा रंगली. या विषयात धुरक्याची छायाचित्रे टिपून ट्वीट करणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते.
  5. टीका आणि टिप्पणीसोबत आनंदोत्सवही ट्विटरच्या माध्यमातून साजरा करणाऱ्या भारतीयांनी ट्विटरने दिलेला दिवाळीचा विशेष ‘इमोजी’ वापरून ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत उत्सवी ट्वीट्स केले. यात दिवाळीच्या फराळापासून ते नवीन कपडय़ांच्या खरेदीच्या छायाचित्रांचा समावेश होता.
  6. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यानंतर २७ मार्च रोजी रंगलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या टी२० सामन्यादरम्यान नऊ लाख ७३ हजार ट्वीट्सची नोंद करण्यात आली.
  7. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशीही ‘आसना’चा ‘इमोजी’ वापरून लाखो ट्वीट्स करण्यात आले.
  8. ग्लोबल सिटिझनच्या कोल्ड प्लेबाबत ९० मिनिटांच्या अवधीत ८० हजाराहून अधिक व्हिडीओज् आणि छायाचित्र ट्वीट करण्यात आली.
  9. ५ ते १६ ऑगस्ट या गणेशोत्सवाच्या कालावधीतही विशेष इमोजीचा वापर करून भाविकांनी एकमेकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याचबरोबर गणेशोत्सवाबाबत माहितीही पुरविली.

वर्षभरातील लोकप्रिय हॅशटॅग

#Rio2016

#IndvsPak

#WT20

#IndvsAus

#MakeInIndia

#IndvsWI

#IndvsBan

#PVSindhu

#surgicalstrike

#JNU

सर्वाधिक अनुयायी व्यक्ती

  • नरेंद्र मोदी – दोन कोटी ५२ लाख
  • अमिताभ बच्चन – दोन कोटी ३८ लाख
  • शाहरूख खान – दोन कोटी २४ लाख
  • सलमान खान – दोन कोटी सहा लाख
  • आमिर खान – एक कोटी ९२ लाख
  • दीपिका पडुकोण – एक कोटी ६७ लाख
  • प्रियांका चोप्रा – एक कोटी ५७ लाख
  • हृतिक रोशन – एक कोटी ५० लाख
  • अक्षय कुमार – एक कोटी ५३ लाख
  • ए. आर. रेहमान – एक कोटी २७ लाख

(अनुयायांची संख्या ५ डिसेंबपर्यंतची आहे.)

नव्याने ट्विटरवर दाखल झाले अन्..

या वर्षांत अभिनेता कमल हसन याने प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीत गातानाचा व्हिडीओ पोस्ट करीत ट्विटरच्या विश्वात प्रवेश केला. यानंतर २४ तासांच्या आत त्याला ३० हजाराहून अधिक अनुयायांनी स्वीकारले. याचबरोबर रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या साक्षी मलिकनेही या वर्षांत ट्विटरवर प्रवेश केला.