राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणी वाया गेली आहे. पण सरकार शेतकऱ्य़ांच्या प्रश्वांवर लक्ष न देता आगामी निवडणुकात कोण किती जागा जिंकेल, या आकडेवारीत गुंतले आहे. सत्ताधाऱ्य़ांनी निवडणुकांची चिंता करण्याऐवजी आधी शेतकऱ्य़ांची चिंता करावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे. सत्ताधारी पक्षाने सध्या राजकारणाचा खेळखंडोबा केला असून किमान दहा शेतकऱ्य़ांची तरी कर्ज माफी झाली का तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाईंची चौकशी कोण करतेय याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असी मागणीही त्यांनी केली.

शेतकऱ्यांचे कर्ज माफीसाठी १३ लाख अर्ज आल्याचे सहकारमंत्री सांगत आहेत, या शेतकऱ्य़ापैकी दहा शेतकऱ्य़ाची तरी कर्ज माफी झाली का, असा सवाल तटकरे यांनी प्रदेश कार्यालयात केला. शेतकऱ्य़ांनी ध्वजारोहन करण्यास विरोध केला नाही तर पालकमंत्र्यांना विरोध केला होता. मात्र या शेतकऱ्य़ांना मुख्यमंत्री देशद्रोही म्हणत आहेत, हे दुर्देवी आहे, अशी खंत तटकरे यांनी व्यक्त केली.

सरकारचा भाग असूनही  शिवसेना जबाबदारी मात्र घेत नाही, सध्या तर सत्ताधारी पक्षच विरोधकांच्या भूमिकेत असल्यासारखे बोलत आहेत, अशी टिप्पणी तटकरे यांनी केली. शिवसेनचे मंत्री सुभाष देसाई यांची चौकशी कोण करणार आहे.