गेल्या वर्षी चिक्की घोटाळ्यावरून महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आरोप झाले असता राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात काहीशी मवाळ भूमिका घेतली होती. आता न्यायालयाच्या निकालानंतरराष्ट्रवादीने पंकजा यांना लक्ष्य केले आहे. हा १२ हजार कोटींचा घोटाळा असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, आणि याची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

महिला व बालकल्याण विभागाच्या खरेदीवरून उच्च न्यायालयाने फटकारल्यावर राष्ट्रवादीने पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. घरपोच आहार योजनेत सुमारे १२ हजार कोटींचा घोटाळा झाला असून, या घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनांना टोलमुक्त करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याची पूर्तता होत नसल्याने मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.