भाभा रुग्णालयात दाखल करण्यास आठमुठेपणा; रिक्षातच प्रसूती

Pune, Doctor Cheated, rs 5 crore, religious settlement Scam , case registered against 5 persons, Pune Doctor Cheated rs 5 crore, religious settlement Doctor Cheated,
स्वर्गप्राप्तीच्या आमिषाने डॉक्टरची पाच कोटींची फसवणूक
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा

वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या ३४ आठवडय़ाच्या गर्भवती महिलेला दाखल करुन घेण्यास हलगर्जीपणा केल्यामुळे रिक्षामध्ये प्रसुती झालेल्या पीडित महिलेला आपले नवजात बाळ गमवावे लागले आहे. प्रसूतीपूर्व ३४ आठवडय़ाच्या उपचारामध्येही डॉक्टरांनी योग्य उपचार केला नसल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे.

मंगळवारी हदीसुद्दीननिसा जावेद खान (२०) ही ३४ आठवडय़ाची एक गर्भवती भाभा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सकाळी १०.३०च्या सुमारास दाखल झाली होती. बाह्यरुग्णालयात गर्दी असल्यामुळे सायंकाळी ४ वाजता डॉक्टरांनी हदीसुद्दीननिसा यांची तपासणी केली. पोटात दुखत असल्याचे सांगूनही डॉक्टरांनी तिला २ ऑगस्टला येण्यास सांगितले. घरी गेल्यानंतर तिला कळा सुरु झाल्या आणि रुग्णालयात येत असतानाच रिक्षामध्ये तिची प्रसुती होऊन बाळाचा मृत्यू झाला.

या प्रकरणात डॉक्टरांनी गर्भवती महिलेला दाखल करुन घेण्यास आडमुठेपणा केल्याचा आरोप तिचा पती आणि नातेवाईकांकडून केला जात आहे.

सध्या ही महिला भाभा रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरु आहे. यामध्ये समावेश असलेल्या डॉक्टरांची चौकशी करण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात वांद्रे विभागातील नगरसेवक एकत्र आले असून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

आमचा वाली कोण?

आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पत्नीला सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र जर सरकारी रुग्णालयात निष्काळजीपणे उपचार केले जात असतील तर आम्ही जायचे कुठे? पोटात दुखत असल्याचे सांगितल्यावर डॉक्टरांनी वेळीच माझ्या पत्नीला दाखल करुन घेतले असते तर हा प्रसंग उद्भवला नसता. यात माझ्या पत्नीच्या जीवाला काही धोका झाला असता तर याची जबाबदारी रुग्णालयाने घेतली असती का? त्यामुळे यापुढे सरकारी डॉक्टरांवर विश्वास ठेवताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

– जावेद खान, पीडित महिलेचा पती