नवी मुंबई महानगरपालिका परिवहनने (एनएनएमटी) सर्वसाधारण आणि वातानुकूलित बस सेवेच्या तिकिट दरात वाढ  केली आहे. सरकारने या वाढीला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. साध्या बसचे पहिल्या टप्प्याचे भाडे ५ रुपयांऐवजी सात रुपये करण्यात आले आहे. वातानुकूूलित बसेसचे पहिल्या टप्प्याचे भाडे १५ रुपये ऐवजी २० रुपये करण्यात आले आहे.
वाढीव दराचा प्रस्ताव २५ जून २०१२ रोजी ठेवण्यात आला होता; परंतु पण डिझेल, सीएनजीचे दरातील वाढ, कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन, महागाईभत्ता, वेतनवाढ  विविध प्रकारचे शासकीय कर, पथकर यावरील देखील खर्च वाढल्याने ‘एनएमएमटी’ला महिन्याकाठी तीन कोटी रुपये तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.  त्याअनुषंगाने ३ जुल रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार रविवार पासून भाडेदरांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.