घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे.
गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत वाढ करुन सरकारने नागरिकांना महागाईचा जोरदार फटका दिला आहे. मोदी सरकारने यापूर्वीच दहा लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना सिलेंडरवर मिळणारे अनुदान रद्द केले आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली असून, नव्या किंमती मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.
काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करुन नववर्षाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल कंपन्यांनी देशवासियांना खुशखबर दिली होती. पेट्रोल ६३ पैसे प्रति लिटर आणि डिझेल १.०६ पैशांनी स्वस्त करण्यात आले होते.