‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’च्या निमित्ताने आयोजित मोफत गुंतवणूक मार्गदर्शनाला ठाणेकरांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिल्यानंतर आता ही संधी मुंबईकरांनाही मिळणार आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता गुंतवणूक तज्ज्ञ मुंबईकरांना सरकारी योजना-भांडवली बाजारांतील mu11गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करतील. तसेच करसवलतीच्या उपायांचीही चर्चा होईल. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘नातू परांजपे – इशान ड्रिम बिल्ड प्रा. लि.’ आणि ‘कोटक म्युच्युअल फंड’ सह प्रायोजक असलेल्या या उपक्रमास ‘एनकेजीएसबी सहकारी बँके’चे पाठबळ लाभले आहे. या कार्यक्रमात कोटक म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा, कर सल्लागार चंद्रशेखर वझे व गुंतवणूक तज्ज्ञ अजय वाळिंबे मार्गदर्शन करतील.

गुंतवणूकविषयक मार्गदर्शन
कधी : मंगळवार, ३१ मार्च २०१५
कुठे : रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
वक्ते : चंद्रशेखर वझे, कर सल्लागार अजय वाळिंबे, गुंतवणूक तज्ज्ञ आणि निलेश शाह, व्यवस्थापकीय संचालक, कोटक म्युच्युअल फंड.