मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
दहशतवादी कारवायांमध्ये सर्वाधिक तरूण १८ ते २१ वर्षे वयोगटातील आढळतात. अशा तरुणांना महाविद्यालयात असतानाच 'जिहाद'च्या नावाखाली भडकवले जाते. त्यांना चुकीचा 'जिहाद' शिकविला जातो. त्यामुळे महाविद्यालय आणि शाळा तसेच या वयोगटातील तरुणांना एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी 'मिशन मृत्युंजय' ही योजना सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रत्येक महाविद्यालयात 'मिशन मृत्युंजय क्लब' स्थापन केला जाणार आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी या तरुणांशी सतत संपर्कात राहावे, हा या क्लब स्थापनेचा हेतू आहे. षण्मुखानंद सभागृहात महाविद्यालयीन युवकांच्या उपस्थितीत या क्लबची स्थापना आयुक्तांनी केली. विद्यार्थ्यांसमोर भाषण न करता खेळीमेळीच्या वातावरणात डॉ. सिंग यांनी संवाद साधला. मिशन मृत्यूंजय म्हणजे काय हे समजावून सांगत त्यांनी त्याचे महत्त्व पटवून दिले. अज्ञान दूर करणे, आसपासच्या घडामोडींविषयी सतर्क राहणे या मूलभूत बाबी असल्याचे त्यांनी सांगितले. १९९२ च्या दंगलीच्या वेळी जकात नाक्यांमार्फत शस्त्रास्त्रे मुंबईत आली. सामानाची तपासणी न करण्याचा भ्रष्टाचार आजही सुरू आहे. कुणालाही एजंटमार्फत बनावट शिधापत्रिका, वाहनपरवाना, निवडणूक ओळखपत्र आणि पॅन कार्ड उपलब्ध करून दिले जाते. नशेबाज लोकांचा अतिरेकी कारवायांसाठी वापर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई पोलीस दलात ३० टक्के महिला पोलीस घेण्यासाठी प्रक्रिया सुरू असून येत्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने महिला पोलीस मोठय़ा संख्येने दिसतील, असे आयुक्त म्हणाले. या महिलांना महत्त्वाची जबाबदारीही दिली जाईल, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक फणसळकर आणि सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते तसेच राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन सचिव आय. झेड. कुंदन आदींनी मार्गदर्शन केले.
मुंबई सर्वासाठी सुरक्षितच
मुंबईत दरवर्षी बलात्काराच्या सरासरी २०० घटना घडतात. परंतु त्यातील ९५ टक्के प्रक रणात आरोपी पीडित मुलीच्या परिचयाचे असतात. त्यामुळे मुलींनी आपापल्या परिचयातील लोक आणि मित्र यांची योग्य पारख करायला हवी, सावध राहायला हवे. मुंबई सुरक्षित शहर आहे. दिल्लीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर काही वृत्तवाहिन्यांनी आपल्या महिला पत्रकार मुंबईच्या रस्त्यावर मध्यरात्री फिरवल्या. पण त्यांच्यासोबत काहीच अनुचित प्रकार घडला नाही. मुंबई सर्वासाठी सुरक्षित आहे. महिलांनी पोलिसांच्या १०३ या हेल्पलाइनचा अधिकाअधिक वापर करावा. मुंबईत या हेल्पलाइनवर गेल्या वर्षी ९७ हजार महिलांनी संपर्क साधला. त्यापैकी १८ हजार प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून न्याय मिळवून दिला. - हिमांशू रॉय सहपोलीस आयुक्त (गुन्हे) गुन्ह्यांचे प्रमाण १९६१ मध्ये ६४.८ टक्के होते, २००० साली ते ४१.८ टक्के झाले तर २०१० या वर्षांत ४० टक्क्यांवर आले आहे
' सदानंद दाते, सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था.
' आईस (इन केस ऑफ इर्मजन्सी) कार्यान्वित
महिलांना सुरक्षा देण्यासाठी मोबाईलमध्ये विशिष्ट तंत्रज्ञान असलेले सॉफ्टवेअर मुंबई पोलिसांनी तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर ६ जानेवारीपासून कार्यरत झाल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. संकटकाळी फक्त एक बटन दाबल्यास हे सॉफ्टवेअर काम करते.
मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर हे सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध आहे. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केल्यास पुढील प्रकारे मदत मिळते -
ल्ल यात तातडीने संपर्क साधता येईल, अशा दहा जणांचे मोबाईल क्रमांक सेव्ह करायचे. मोबाईलधारक संकटात असेल तेव्हा हे एक बटन दाबल्यास या दहा जणांना मी संकटात आहे(आय एम इन डिस्ट्रेस) असा इंग्रजीत संदेश जाईल.
ल्ल या सॉफ्टवेअरमध्ये जीपीस प्रणाली असल्याने ही व्यक्ती कुठे आहे त्याचा ठावठिकाणा या दहा लोकांना समजेल. जेणेकरून ते तुमच्यापर्यत मदत पोहोचवू शकतील.
* मोबाईल सायलेंट किंवा व्हायब्रेटवर असेल आणि संकटकाळी हे बटन दाबल्यास ३० सेकंद मोठा अलार्म वाजेल आणि तुम्ही संकटात आहात याची माहिती आसपासच्या लोकांना मिळेल.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















