कितीही अडचणी आल्या, तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्यातच होणार असल्याचा ठाम निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्यानंतर आता हे स्मारक अधिक भव्य बनवण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिवसेनाप्रमुखांच्या या स्मारकासाठी महापौर बंगला मिळवल्यावर बंगल्यालगत असलेला पार्कक्लबचा भूखंड घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या भूखंडाचा मक्ता संपल्याने तो ताब्यात घेण्याची प्रक्रियाही पालिकेने सुरू केली आहे.