मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
हिंदू धर्मातील वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर मागासवर्गातील (ओबीसी) अनेक समाजघटकांच्या संघटनांनी एकत्र येऊन राज्यभर धर्मातर अभियान सुरू केले आहे. 'आता ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर' असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर २०१६ ला नागपूरमध्ये लाखोंच्या संख्येने ओबीसींच्या धर्मातरासाठी ही तयारी सुरू आहे. देशातील प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे पुढील तीन वर्षांत अशा परिषदा घेण्याचे नियोजन आहे.
भारतीय समाजात संख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसी समाजाला स्वतची कसलीही ओळख नाही. हा समाज हिंदू धर्माचा एक भाग असला तरी, उच्चनीचतेच्या उतरंडीत त्याला खालचाच दर्जा दिला जातो. ओबीसींच्या नावाने करण्यात येणाऱ्या राजकारणाचा फायदा काही ठराविक नेत्यांनाच फक्त होतो. समाजाला त्याचा काहीच फायदा होत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मातर करुन बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतरच आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थाने धार आली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला एक वेगळी ओळख मिळाली. बुद्धिवाद व विज्ञानवादाच्या अधिष्ठानावर संपूर्ण भारतीय समाजाची फेरउभारणी करण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न होता. तोच विचार स्वीकारण्याचा निर्णय ओबीसींनी घेतला असून धर्मातरापूर्वी या समाजात जागृती घडवून आणण्यासाठी राज्यभर अभियान सुरू केल्याची माहिती सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी दिली. धर्मातराचे अभियान सुरू करुन छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या प्रस्थापित राजकीय नेत्यांसमोर एक आव्हान उभे करण्याचाही त्यातून प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे
६ जानेवारीला पुण्यात परिषद
या अभियानाला गेल्या वर्षी नागपूरपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला मुंबईत दुसरी परिषद झाली. तिसरी परिषद ६ जानेवारीला पुण्यात होणार असून त्यात ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले व डॉ. आ. ह. साळुंखे उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद व कोल्हापूरलाही अशाच सभा घेण्यात येणार आहेत.




















हि प्रसिद्धि मिळविण्याची शक्कल आहे, ह्या काळात कोणी उच्चनिच्चता मानत असतील तर त्यांच्यामुळे कोणाची हानी होणार नाही कारण आज सर्व स्वतंत्र आहेत. कोणी कोणाला भीक घालत नाहीत.
खरोखरच हा प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेला एक केविलवाणा प्रयत्न आहे. कारण आज ओबीसींना एवढे आरक्षण असताना देखील जर धर्मपरिवर्तन करण्याची गरज भासत असेल तर याचा विचार त्यांनीच करावा कि त्यांच्यातीलच काही संधिसाधू लोकांनी राजकीय खुर्च्या बळकावून झाल्यानंतर त्यांच्याच लोकांना चुना लावला आहे. म्हणून आता यापुढे त्यांनी डोळे उघडे ठेवून आणि बुद्धी वापरून मतदान करण्याची गरज आहे. असे जर त्यांनी केले तर त्यांचा भाग्योदय त्यांच्याच हातात आहे.
ज्या ओसीबीनी बुद्धिवाद व विज्ञानवाद विचारांचंचा स्वीकर करण्याचे ठरविले आहे त्यांना शुभेच्छा .वार्ताहाराला नावे जर त्यांची माहित होती तर त्याचा उल्लेख या वृत्तांतात का केला नाही?भारतीय समाजात संखेने सर्वाधिक असलेल्या ओबीसी समाजाला स्वतःची ओळख नाही हे विधान सत्याला धरून नाही.दिशाभुल करणारे आहे..परिस्थिती याच्या उलट आहे.अगोदरच आरक्षणाशिवाय अनेक ओबीसी व्यक्तिंनी आपले कर्तुत्व ,खरी ओळख भारताला दाखविलेली आहे निधर्मी भारतात धर्मांतर करुन ओसीबींना काहीच फायदा होणार नाही.न घरका ना घाटका अशी परिस्थिती निर्माण होणार आहे .बुद्धिवाद सर्व धर्मात आहे.विज्ञानवाद हा सर्वथा आवास्तव आहे.दुसर्याच्या धर्मापेक्षा आपला धर्म कसाही असलातरी तरी तोच कल्याणकारक होतो आपल्या धर्मासाठी मृत्यु आला तरी उत्तम पण परधर्म -दुसर्याचा धर्म अत्यंत अनर्थकारक होय हे सर्व ओबीसींना माहित आहे.तेव्हां धर्मांतराचा प्रश्न येतो कोठे?
Hidden due to low comment rating. Click here to see.
आज खरया अर्थाने बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. आणि मान्य कि बुद्धिवाद हा सर्व धर्मात आहे पण ज्या धर्मातील लोक माणसाला माणसा सारखी वागणूक देत नसतील, अश्या धर्माला लवकरात लवकर तिलांजली दिलेली बेहतर ठरेल.
आणि जेष्ठ विचारवंत राजाभाऊ ढाले ह्या परिषदेत असल्यामुळे तिथे जाण्याची उत्सुकता आणखीन च वाढली आहे.
जयभीम …!!!
अरे राजा प्रोब्लेम धर्माचा नाही माणसांचा आहे.
माने साहेबांनी काय दिवे लावले तुम्ही पहिलेच आहे ना. माझे बुध मित्र लग्न करताना समोरची मुलगी पूर्वी कुठल्या जातीतली होती ते बघत होते. आणि मला म्हणाले कि ती खालच्या जातीतली आहे. माझ्या मते हे बाबा साहेबांना नक्कीच अपेक्षित नव्हता, नसावा. त्यामुळे उगीचच कूप मंडूक वृत्ती अंगी बाळगण्या पेक्षा, पुढे येउन यावर उपाय शोध.
मला तरी व्यक्तीशः असे अजिबात वाटत नाही कि OBC समाजाला कुठल्याही प्रकारे कमी लेखले जाते. हे जे काही आहे ते समाज तोडण्यासाठी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाती मुले जे आरक्षण दिले जाते त्या फायद्यासाठी आहे. त्यामुळे जाती वरून आरक्षण देणेच बंद केले पाहिजे. आज छोट्या मोठ्या शहरात जातीला काही महत्व राहिलेले नाही, त्यामुळे OBC तरुणांनी तरी किमान ह्या सर्व गोष्टींपासून दूर रहावे.
जर जातीला महत्व राहिले नाही तर तुम्ही धर्माला का महत्व देता…..
आणि छोट्या मोठ्या शहरा मध्येच ज्यास्त जातिवाद आणि धर्म वाद चालतो….
पाहणार्याला बाहेर जी वस्तु आहे ती खरोखर एखादा पदार्थ असतो असे नसून पाहणार्याच्या चित्तातील विज्ञानच पदार्थाकाराने परिणत पावत असते हे बौध्दांच्या क्षणिक विज्ञानवादाचे थोडक्यात स्वरुप आहे. हा विज्ञानवाद खरा असता तर अन्न वस्त्रादिकांच्या प्राप्तीसाठी काही धडपड करण्याची गरज उरली नसती.कारण प्रत्येकांने आपाअपल्या विज्ञानातून ते पदार्थ निर्माण केले असते. तेव्हा क्षणैक विज्ञानवाद हा सर्वथा अवास्तव आहे.
दलितांच्या उध्दारासाठी बाबासाहेबांनी आरपीआय हा राजकीय पक्ष स्थापला. बौद्ध धर्माची दीक्षा दिली. आता त्या पक्षातील बौद्ध धर्मिय एकमेकांना माणसासारखे वागवत नाहीत.स्वार्थासाठी पक्षाच्या ठिकर्या ठिक्र्या केल्या. बाबासाहेबांच्या पवित्र आत्म्याला काय वाटत असेल? हीच का बाबासाहेबांची स्वप्नपूर्ती? जयभीम !!!
बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना धम्मक्रांती ची चळवळ दिली होती, राजकीय नव्हे. तर राजकारणात लोक आपल्या स्वार्थ साठी काय करतात त्याने काही फरक च पडत नाही. आणि धम्मा ची शिकवण हि काही एखाद्या राजकीय पक्षातून मिळत नसते, तर उगाच राजकारणाला मध्ये आणून वरील बातमीत विषयांतर नको.
जयभीम …!!!
ओबीसी समाज धर्मांतराच्या वाटेवर ह्या बातमीने नक्कीच तथाकथित संस्कृती रक्षकांचे धाबे दणाणले आहेत, हे त्या नंतर उमटत असलेल्या प्रतिक्रियांवरून स्पष्टपणे जाणवतं. लोकसत्ता सारक्या मेनस्ट्रीम वर्तमानपत्रात हि बातमी नवीन असेल, पण आंबेडकरी वृत्तपत्रांना हे नव नाही. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांच्या प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे हा काही जोर जबरदस्तीचा प्रकार नाही. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न आहे. सर भारत बौद्धमय करीन हे त्यांचं स्वप्न त्यांच्या महापारीनिर्वाणामुळे शक्य झालं नाही. ते पूर्ण होण्यासाठी इतर कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. हनुमंत उपरे हे त्यापैकीच एक. त्यांच्या कार्याला शुभेच्चा. आज ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या केदार केळकर यांच्या पत्रात ते म्हणतात कि ‘आंबेडकरी चळवळ निष्प्रभ ठरत आहे. चळवळीला धार आली म्हणजे काय ? धर्मांतराने परिस्थिती बदलली का ?’ तर केळकर साहेब, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या एका बातमीत आहेत. ओबीसींच्या परिवर्तनाचा विचार केला तर बाकीचं सर्व तूर्तास बाजूला ठेवूया. केवळ हिंदू धर्मातल्या पूजाअर्चा जरी ओबीसी समाजाने धर्मांतरानंतर टाळल्या ना तरी खूप फरक पडेल.
आर्थिक तर निश्चितच पडेल. मार्गशीर्ष महिना सध्या सुरु आहे. पुढच्या गुरुवारी सर्व ओबीसी स्त्रिया आपापल्या घरी उद्यापन करतील. एक ओबीसी भगिनी इतर ५ भगिनींना महालक्ष्मी व्रताची पुस्तके देईल. प्रत्येकीच्या घरात पुस्तकांचा खच असेल. पण तरीही त्या ते पुस्तक, एखादं वाण आणि एखादा गजरा किंवा फुल हे सर्व मनोभावे घेतील. इतरांना देतील. या सगळ्याचा एकूण खर्च तिच्यालेखी क्षुल्लक असेल. कारण त्यामुळे ती हिंदू धर्मात (कधी सांगितला माहित नाही) सांगितल्याप्रमाणे आर्थिक संपन्नेसाठी हे सर्व करणार आहे, ते तिच्या आईनेही केलं होतं. म्हणून ती मुलीलाही करायला सांगेल. हा खर्च बाबासाहेबांनी सांगितलेल्या अनुत्पादक खर्चात मोडतो हे जेंव्हा तिला पटेल तेंव्हा ती हि व्रतवैकल्ये करील का ? नाही. मग नुकसान कोणाचा होणार आहे ? तर देवीदेवतांच्या नावावर घबाड जमावणार्याचं. मग हे संस्कृती रक्षकांना चालेल का ? मग गणपती, दिवाळी, सत्यनारायण, नवरात्र, साई भंडारा, यात्रा जत्रा आणखी काय काय यांचं मार्केट बंद होईल. कारण याचा ग्राहक हळूहळू का होईना पण बंद नक्की होईल. हि बाब केवळ धर्मकारणाची नाही, तर अर्थकारणाची आहे. म्हणून या बातमीने प्रस्थापितांचे धाबे दणाणणे स्वाभाविक आहे. कोणाला याविषयीची अधिक माहिती वाचावयाची असल्यास त्यांनी आंबेडकरी वर्तमानपत्रे जरूर वाचावीत. यात छापून येणारे लेख तुमच्या मेंदूचा भुगा केल्याशिवाय राहणार नाहीत.
Hidden due to low comment rating. Click here to see.
बाबासाहेबांनी RPI स्थापन केला नाही जर नित इतिहास वाचा.
ह्या बातमीचा निषेध होणे स्वाभाविक आहे . ज्यांनी हे वक्तव्य केलेले आहे त्यांनी कदाचित आपला इतिहास आपला हिंदू धर्म आणि आपल्या संस्कृतीचा अभ्यास केलेला दिसतच नाहीये. हे कुणीतरी मुर्खाने केलेले वक्तव्य आहे. हे असले काहीतरी करण्यापेक्षा समाजकार्य करा समाज तोडण्याचे काम करू नका. आपणच सरकार आहोत आपणच सरकार बनवतो. समाजाला एकत्र आणून निवडणुका लढा योग्य उमेदवार निवडून समाजाला चांगली दिशा कशी मिळेल त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.गुजरातमध्ये देखील ह्याच प्रकारे परिवर्तनाला सुरवात झाली.तेथे होवू शकते तेव्हा येथे सुधा होवू शकते. परिवर्तन हि काळाची गरज जरी असली तरी त्यासाठी चांगले नेतृत्व आणि दूरदृष्टी असणारे घटक हवे. भावूक होऊन निर्णय घेणारे हे नेहमी स्वतः बरोबर दुसर्यांना सुद्धा खड्ड्यात पाडतात.छत्रपती शिवराय, महात्मा फुले,आंबेडकर, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी नेहमी समाजाला एक दिशा करून दिली आणि त्यावरून जाण्यासाठी शक्तीदेखील दिली.हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
अरेरे ! बिच्च्च्च्च्च्च्च्च्च्च्चारे ओबीसी !
त्यांना वाचवा रे वाचवा !
Hidden due to low comment rating. Click here to see.
Hidden due to low comment rating. Click here to see.
Hidden due to low comment rating. Click here to see.
Hidden due to low comment rating. Click here to see.
कालचा हिंदु अश्पृश समाज आणि आजच बोध्द समाज यामंधील फरक सर्व काही सांगून जातो कि धर्मांतर केल्याने काय होते. काल ज्याला इथल्या व्यवस्थेने शिक्षण घेऊ दिले नाही तोच समाज आज शिक्षणात इतर समाजाच्या कितीतरी समोर आहे. आणि गेल्या ६६ वर्षाचा मांगोवा घेतला तर फक्त बोद्ध समाजाची प्रगतीच झालेली आपल्याला दिसेल.
this is going to done because of half knowledge of thoughts of Dr.Babasaheb Ambedkar. All these people who want to change their religion refer the book “anihilation of Caste ” written by Dr.Ambedkar.
वर कमेंट केलेल्या लोकांना बाबासाहेब व भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्वाद्यानाचा अभ्यास नाही अस दिसतंय . ज्या लोकांनी दहा दिवसच विपशाना केली असेल त्यांना च बुधीसम काय आहे ते कळेल व त्याची आज जगाला किती आवशकता हे सुद्धा कळेल,कधीही धर्माचा आपल्या जीवनात उपयोग झाला पाहिजे तरच तो खरा धर्म असतो ……..
आज छोट्या मोठ्या शहरात जातीला काही महत्व राहिलेले नाही, त्यामुळे OBC तरुणांनी तरी किमान ह्या सर्व गोष्टींपासून दूर रहावे.असे जे कोणी बोलतात त्यांना मी आव्हान करतो त्यांनी आपल्या आजू बाजूला नीट बघून बाहेर मित्रात, नात्यात, शोध घ्या अजून हि जातीवर च व्यवहार करताहेत , जर आपण बोलता जातीबद्ल आता कोणीही मानत नाही तर ठीक , जर कोणी बोलत असेल आणि बोलणारी व्यक्ती भेटली तर त्याच्या (जाती बद्दल बोलणाऱ्याच्या ) थोबाडात मारायची हिम्मत आहे का …..? हे बोलन फार सोपं आहे … जो कोणी काय करतोय त्याला त्याच करुद्या ….. आरक्षण सौरक्षण त्यानच त्ये बघून घेतील
हि बातमी शंभर टक्के खरी नसली तरीही काही अंशी खरी आहे याचे कारण स्वतः ओ बी सी समाज . मुख्य म्हणजे ओ बी सी स्वतामध्ये बदल करायला तयार नाहीत जीवनातील प्रत्येक गोष्ट पुराणाप्रमाणे किव्हा भटजीच्या बोलण्याप्रमाणे न करता वास्तविकता किव्हा वर्तमानाला धरून कृतीत आणायला हे तयारच नाहीत . प्रत्येक गोष्टीचा देवाशी संबंध लाऊन हे भट-भटजींच्या तुंबड्या भरत असतात. आपल्या पारंपारिक गोष्ठी मध्ये कोणताही बदल करायला तयार नसलेले ओ बी सी वर्तमानाशी हि जुळून घ्यायला तयार नाहीत. अनाडीपणा, सहसा कोणाचे नेतृत्व मान्य नसणे, खेकडे वृत्ती, चाकोरीबाहेरच्या जीवनाला घाबरणे ई आंम्हा ओ बी सी च्या मागासलेपणाची करणे आहेत . यांचा हे मुंडे भूजाबलादी लोक गैर फायदा घेतात. नाहीतरी त्यांचे ते कामच असते .सुशिक्षितपणा आणि घेतलेल्या शिक्षणाचा स्वताच्या जीवनात उपयोग करत नाहीत तोपर्यंत ओ बी सी मागेच राहणार.
धर्म आणि धर्मांतर हि व्यक्तिगत बाब आहे .जर मागास्वर्गीयाना धर्मांतर करायचेच असेल तर खुशाल करावे मात्र आरक्षण परत मागू नये
मागासवर्गीयांच्या नेत्यांनी आपल्याच नातालागाना पुढे जावू दिले आहे मुंडे आणि भुजबळ दोन्ही हि या करिता जबाबदार आहेत. जर आपण यांना निवडूनच दिले नाही तरच आपल भल होणार आहे. भुजबळ आणि मुंडे यांनी आमच्या समाजा करिता काय केले आहे ?
धर्मांतराने काहीही फरक पडणार नाही.. जर स्वताचे आयुष्य उज्ज्वल करावयाचे असेल.. तर स्वयं प्रकाशित व्हा … स्वताला ओळखा …