हार्बर मार्गावर सलग दुसऱया दिवशी सीएसटी-मस्जीद बंदर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ११.५५ पासून हार्बर रेल्वेसेवा ठप्प झाली होती. दुरूस्तीचे काम सुरू असले तरी रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या हार्बर रेल्वेची वाहतुक २० मिनिटे उशीराने सुरू आहे.
सोमवारी देखील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने हा मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला होता. परिणामी प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते.