सँडहर्स्ट रोड स्थानकात हार्बर मार्गावरील एका गाडीतून खाली पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
हार्बर मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या गाडीतून प्रवास करणारी एक अंदाजे ३५ वर्षांची व्यक्ती गाडीतून  पडली. अधीक्षक आर. के. शर्मा यांनी तातडीने या जखमीला  सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.