मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणीची प्रक्रिया १ जूनपासून सुरू होत आहे.

प्रथम वर्ष बीए, बीए (फ्रेंच स्टडी, जर्मन स्टडी) बीकॉम, बीएस्सी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएस्सी (आयटी), बीएस्सी (नॉटिकल सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एव्हिएशन), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीकॉम (बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स), बीकॉम (अकाऊंट अ‍ॅण्ड फायनान्स), बीकॉम (फायनान्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट), बीएमएस, बीएमएस-एमबीए, बीव्होक, ग्रंथालय विज्ञान अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.

Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Big updated for admissions under RTE Online application registration will start
आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी मोठी अपटेड… ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू…
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी  mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( click on-Mumbai University Pre Admission online Registration 2017-18) या िलकवर जावे. अर्ज भरताना अडचणी आल्यास ९३२६५५२५२५ या हेल्पलाइनवरही संपर्क करू शकतात.

हे लक्षात ठेवा

  • नोंदणी करण्यापूर्वी महाविद्यालयातून प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका खरेदी करून त्यातील विषय व विषयसमूहाप्रमाणेच (Combination) विषय निवडणे बंधनकारक
  • प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी बहुमहाविद्यालये, बहुअभ्यासक्रमासाठी करता येईल.
  • विद्यार्थ्यांनी शिक्षणक्रमनिहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाकरिता योग्य दस्तऐवजासह सादर करावी.
  • नोंदणीसाठी स्वत:चा स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरीची सॉफ्ट कॉपी सोबत असणे आवश्यक आहे.
  • नोंदणीसाठी विद्यार्थ्यांकडे स्वत:चा ई-मेल व मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.
  • सोबत दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात.
  • विद्यार्थ्यांचे शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचा अधिकार महाविद्यालयाच्या प्राचार्याना
  • स्वायत्त महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबतचे नियम व अधिकार हे विद्यापीठ व शिखर संस्थांच्या नियमास अधीन राहून महाविद्यालयांच्या प्रचलित नियमाप्रमाणे असतील.
  • प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी नमूद केलेल्या कालावधीत होणे गरजेचे.

– विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही.

प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक

  • अर्ज विक्री ही ३१ मे ते १५ जूनपर्यंत (कार्यालयीन दिवस)
  • प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया – १ ते १६ जून
  • प्रवेश अर्जाची प्रिंट घेऊन महाविद्यालयात सादर करण्याची तारीख – १६ ते २२ जून (दुपारी ४ वाजेपर्यंत, कार्यालयीन दिवस) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस प्रवेश आणि अल्पसंख्याक प्रवेश या कालावधीत करता येईल.
  • पहिली गुणवत्ता यादी – २२ जून (सायंकाळी ५ वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : २३ जून, २७ जून आणि २८ जून (४.३० वाजेपर्यंत)
  • दुसरी गुणवत्ता यादी – २८ जून (सायंकाळी ५ वा.)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – २९ जून ते १ जुल (४.३० वाजेपर्यंत)
  • तिसरी गुणवत्ता यादी – १ जुल (सायंकाळी ५ वा.)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – ३ ते ५ (४.३० वाजेपर्यंत)