अद्याप अवघे ७० ते ८० अंक बाजारात; अंकांच्या किमतीत २० रुपयांची वाढ

मराठी साहित्य-सांस्कृतिक विश्वात महत्वाचे स्थान असलेल्या आणि दरवर्षी साहित्यप्रेमी वाचकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळणाऱ्या दिवाळी अंकांच्या खरेदीला यंदा उतरती कळा लागली आहे. दिवाळी अवघ्या तीन-चार दिवसांवर येऊन ठेपली असली तरी दिवाळीचा ‘साहित्य फराळ’ अर्थात दिवाळी अंकाना म्हणावी तशी मागणी आलेली नाही. यंदा अद्याप अवघे ७० ते ८० अंक बाजारात आले असून दिवाळी अंकांच्या किमतीतही २० रुपयांनी वाढ झाली आहे.

In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
MHADA e-auction shops Mumbai
म्हाडाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव लांबणीवर; नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ
mumbai, malad, Malvani, Three Youths, Fall into Drain, Two Declared Dead, Tragic Incident,
मुंबई : मालाड येथील मालवणीमध्ये तिघे गटारात कोसळले; दोघांचा मृत्यू

सर्वसाधारणपणे दसऱ्याला व त्यानंतर लगेचच दिवाळी अंक बाजारात यायला सुरुवात होते. सर्वसामान्य साहित्यप्रेमी, दिवाळी अंकांचे म्हणून असलेले खास वाचक तसेच खासगी आणि सार्वजनिक ग्रंथालये, कार्यालय, गृहनिर्माण संस्था येथून दिवाळी अंकांची खरेदी केली जाते. ग्रंथालये किंवा काही ठराविक लोकांनी एकत्र येऊन दिवाळी अंकांचे फिरते वाचनालय सुरु करण्यासाठी केलेल्या दिवाळी अंक खरेदीचा अपवाद वगळता वैयक्तिक दिवाळी अंक खरेदीचा जोर यंदा तुलनेने कमी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीपर्यंत दिवाळी अंक भेट संचाच्या नोंदणीलाही चांगली मागणी होती. मात्र यंदा त्यालाही कमी प्रतिसाद मिळाल्याचे वसई येथील ‘अभ्यंकर आणि मंडळी’ या पुस्तकांच्या दुकानाचे अनिल अभ्यंकर यांनी सांगितले.

गेली वर्षांनुवर्षे ज्या दिवाळी अंकांनी वाचकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे असे ‘दर्जेदार’ अंक मात्र बाजारात आले असून त्यांना दरवर्षीप्रमाणे चांगली मागणी आहे. ते आजही टिकून आहेत. मात्र केवळ ‘जाहिरातींवर’ चालणारे जे दिवाळी अंक आहेत ते अद्याप बाजारात आलेले नाहीत. त्यांची संख्या कमी असल्याचे दिवाळी अंक विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. यंदाच्या वर्षी दिवाळी अंकांच्या किमतीत सुमारे २० रुपयांनी वाढ झाली असून यंदा दिवाळी अंकांच्या किंमती किमान १५० ते २०० रुपये आणि कमाल ३०० रुपयांच्या घरात आहेत. यंदाच्या वर्षी ‘प्रपंच’ आणि ‘मानिनी’ या लोकप्रिय अंकांनी ‘ऑनलाईन’ दिवाळी अंकाचा प्रयोग केला आहे. हे अंक पहिल्यांदा ‘ऑनलाईन’ स्वरुपात तर नंतर ‘मुद्रीत’स्वरुपात वाचकांपुढे आले आहेत. दिवाळी अंक खरेदीचे चित्र येत्या १ नोव्हेंबरपासून दिवाळी अंक खरेदीला उठाव येईल, असा विश्वास ‘बी.डी. बागवे कंपनी’चे हेमंत बागवे यांनी व्यक्त केला.

  •  पाककृती, ज्योतिष, धार्मिक, अध्यात्मिक विषयक अंकांना मागणी
  • मानकर काका यांचा लोकप्रिय ‘टॉनिक’ हा दिवाळी अंक यंदा नाही
  • हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ हे अंक नवरात्रातच बाजारात दाखल
  • लहान मुलांचे दिवाळी अंकही तुलनेत कमी