हार्बर मार्गावरील माहिम-वांद्रे दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. हार्बर मार्गावरील धीम्या गतीची वाहतूक जलद गती मार्गावर वळविण्यात आली आहे.
ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून लवकरच हार्बर वाहतूक पूर्वपदावर येईल असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. प्र