हैदराबाद स्फोटांत पाकिस्तानचाचं हात- लालकृष्ण अडवाणी

हैदराबादमध्ये गुरूवारी झालेल्या स्फोटांत पाकिस्तानचाचं हात असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी

पीटीआय,मुंबई | February 23, 2013 06:07 am

हैदराबादमध्ये गुरूवारी झालेल्या स्फोटांत पाकिस्तानचाचं हात असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारले आहे असेही ते म्हणाले. “गेल्या काही दशकांमध्य भारताला प्रत्यक्ष युद्धात गुंतवून ठेवण्यात पाकिस्तान यशस्वी झालेला नाही. त्यामुळे आता पाकिस्तानने छुप्या युद्धाचा अवलंबकेल्याचे दिसत आहे त्यामुळे हैदराबाद स्फोटांत पाकिस्तानचाचं हात आहे यात काही शंका नाही” असेही अडवाणी यांनी स्पष्ट केले.
भारताविरुद्धच्या दहशतवादासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करू दिला जाणार नाही असा करार भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या झाला होता. त्याचे पाकिस्तानने पालन करायला हवे असेही अडवाणी यांनी सांगितले

First Published on February 23, 2013 6:07 am

Web Title: pak behind hyderabad twin blasts l k advani