सिडकोच्या आग्रहामुळे नैना क्षेत्रातील ३६ गावे वगळली

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पनवेल व परिसरातील ३२ गावांचा समावेश करून नवी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली आहे. याबाबतच्या निर्णयावर आजच मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले असून सिडकोच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरात विकसित होणाऱ्या नैना विशेष क्षेत्रातील ३६ गावे मात्र महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. येत्या १५ दिवसांत याबाबतची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागातील सूत्रांनी दिली.

municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
Submerged area of proposed Poshir Dam soil survey to start soon
प्रस्तावित पोशीर धरणाच्या बुडित क्षेत्र, माती सर्वेक्षणाला लवकरच प्रारंभ
Navi Mumbai
नवी मुंबई : एमएमआरडीएच्या नवनगर निर्मितीमुळे १२४ गावे उद्ध्वस्त होण्याची भीती

नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरातील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन या भागाचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल नगरपालिकेसह सिडकोच्या हद्दीतील २१ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ आणि नयनाच्या क्षेत्रातील ३६ अशा ६८ गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्य़ातील पहिली पनवेल महापालिका स्थापन करण्याचा निर्णय सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. यानुसार प्राथमिक अधिसूचना काढून लोकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या वेळी तीन हजार ९३६ हरकती व सूचना आल्या होत्या. त्यात सिडको आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने आक्षेप घेतल्याने तिढा निर्माण झाला होता.

तिढा सोडवला जात असतानाच आता नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सरकारला कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगाने घेतल्याने सरकारच्या मोहिमेला धक्का बसला. त्यातच नगरपालिका निवडणुकीनंतर किमान वर्षभर महापालिका स्थापन करता येत नसल्याने महापालिकेची स्थापना किमान वर्षभर तरी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर महापालिका स्थापनेसंदर्भात सरकारने आठ दिवसांत अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने गेल्याच आठवडय़ात दिले होते.

त्यानुसार आज महापालिका स्थापनेच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले. मात्र महापालिका स्थापन करताना पूर्वी समाविष्ट करण्यात आलेली नयना क्षेत्रातील ३६ गावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता पनवेल नगरपालिका आणि सिडको क्षेत्रातील २१, तर एमएमआरडीए क्षेत्रातील ११ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला आहे.