ठाणे येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार आत्महत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील नगरसेवक हनमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. त्यामुळे या चारही नगरसेवकांना अटक होण्याची शक्यता आहे.
परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी हनमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला या चार नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर या चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून अंतरिम दिलासा दिलेला होता. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. सोमवारी सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी या चौघांच्या कोठडीची आवश्यकता स्पष्ट केली होती. त्या पार्श्वभूमीवर या चौघांचाही अटकपूर्व जामीन मंगळवारी फेटाळण्यात आला.