डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी तपास करण्यासाठी पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्लॅंचेट प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. या संदर्भात समितीचे शिष्टमंडळ पुढील आठवडय़ात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेणार आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही समितीने केली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे सुपूर्द करण्यात आला आहे. हा तपास अधिक गतीमान व्हावा तसेच तपासकामाच्या पाठपुराव्याबाबतही समितीचे शिष्टमंडळ या भेटीत सिंह यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समितीच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.