येथील उलनचाळ येथील वस्तीत गोमासाची विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी मनसेचा शहर उपाध्यक्ष युसुफ काशिद शेख याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उलनचाळ परिसरात गोमांस विक्री होते, अशा तक्रारी होत्या. रविवारी पहाटे उलनचाळ परिसरात मुख्य रस्त्याला लागून असलेल्या बंद दुकानात गोवंशांची हत्या करुन ते मांस विकण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांना एका सामाजिक संस्थेने दिली होती. त्या आधारे अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाळकृष्ण वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी तीन गोवंशाची हत्या करुन त्याच्या मासाचे तुकडे करतांना पोलीसांनी आरोपींना अटक केली. या दुकानात एक लहान वासरू आणि ६ महिन्यांचा बैल देखील कोंडुन ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गोवंश हत्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी गोवंशाची हत्या करण्यात येत होती तो गाळा आणि तेथे काम करणारे सर्व कामगार हे शेख याचेच होते. शेख याचा मांस विक्रीचा व्यवसाय आहे. तेथून शफी इबाहीम कुरेशी, रियाज मोहमद्द शेख, अजाद निजामुद्दतीन कुरेशी आणि सज्जाद निजामुद्दीन कुरेशी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.