नागपाडा जंक्शन येथे शुक्रवारी ‘ऑल इंडिया मजलिस ए-एतिहाद अल-मुस्लिमिन’ (एआयएमआयएम) चे नेते आणि तेलंगणा विधानसभेचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची सभा होणार आहे. ‘एआयएमआयएम’ पक्षाच्या प्रचाराचा नारळही या सभेत फोडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओवेसी नक्की या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रात्री आठ वाजता ओवेसी यांचे भाषण होणार असून कायदा सुव्यवस्था लक्षात घेता मोठा बंदोबस्त ठेवला आहे, अशी माहिती नागपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नंदकुमार म्हेतर यांनी दिली.
ओवेसीच्या सभेला परवानगी दिलेली असली तरी कायदा सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता झोन मधून अतिरक्त पोलीस बळ मागविण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. सभेच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकरी हजर राहतील, असंही म्हेतर म्हणाले.