रुग्णवाहिकेत गंभीर रुग्ण.प्रत्येक सेकंद महत्वाचा.रुग्णालयाचा पत्ताही सापडत नाही, वाहतूक कोंडीमुळे उशीर होतोय. अशी अवस्था अनेकदा रुग्णवाहिकांची होत असते. अशावेळी फक्त वाहतूक नियंत्रण कक्षाचा फोन फिरवला की अवघ्या काही मिनिटात वाहतूक पोलीस रुग्ण वाहिकांच्या मदतीला येतील आणि मार्ग काढून देतील.
रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकू नये आणि त्यांना प्राधान्याने पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा, यासाठी राधी स्वयंसेवी संस्था आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट आदींच्या सहकार्याने हे अभियाने या मोहिमेबाबत माहिती देताना सहपोलीस आयुक्त (वाहतुक) बी.के.उपाध्याय यांनी सांगितले की, रुग्णवाहिकांच्या मदतीसाठी पोलीस दल प्रयत्नशील असणार आहे. रुग्णवाहिकांना कसा मार्ग काढून द्यायचा याचे प्रशिक्षण सर्व वाहतूक पोलिसांना दिले जात आहे.
बाहेरगावातून मुंबईत येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी जागोजागी माहितीपूर्ण फलक लावण्यात येणार आहे. त्यावर नियंत्रण कक्षाचा ०२२-२४९३९७१७ हा क्रमांक असेल. त्यावर संपर्क केला काही मिनिटात वाहतूक पोलीस मदतीला येतील आणि रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून रुग्णालयापर्यंत पोहोचवतील.