रिलायन्स इंडिस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना इंडियन मुजाहिदीनकडून मिळालेल्या धमकीच्या पत्रानंतर पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली. पीटीआय वृत्तसंस्थेला सूत्रांनी ही माहिती दिली. 
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि त्या राज्यात गुंतवणूक केल्याबद्दल अंबानी यांना धमकाविणारे पत्र इंडियन मुजाहिदीनने पाठविले. अंबानी यांच्या कंपनीतील कर्मचाऱयाकडे एका अज्ञात व्यक्तीने बंद पाकिटात २४ फेब्रुवारीला हे पत्र दिले. अंबानी राहात असलेल्या ऍंटिला इमारतीवरही हल्ला करण्याची धमकी पत्रामध्ये देण्यात आली आहे.
हे पत्र हाताने लिहिले आहे. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी डॅनिशची सुटका करण्याची मागणीही पत्रामध्ये करण्यात आलीये. जर त्याची सुटका केली नाही, तर अंबानींवर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला आहे.