शिक्षकांनीच नऊ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर मिरा रोड येथील शाळेच्या मुख्याध्यापिकेन राजीनामा दिला. या घटनेमुळे पालकांच्या प्रचंड रोषाला शाळेच्या व्यवस्थापनला सामोरे जावे लागले. यासाठी कडक पोलीस बंदोबस्तात शनिवारी एक बैठक पार पडली.
विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. यासाठी बैठक घेण्यात आली. या वेळी दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते. शाळेतील बालवाडी ते सातव्या इयत्तेपर्यंत महिला शिक्षक नेमावे, शाळेत कोणत्याही शिक्षक वा कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याआधी त्याची पोलिसांकडून चौकशी केली जावी, शाळेच्या बसमध्ये महिला मदतनीस तसेच बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या मागण्या व्यवस्थापनाने मान्य केल्या. याप्रकरणी अटक झालेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत एक डिसेंबपर्यंत वाढ करण्यात आली आहे.