ऑर्थर रोड तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमध्ये सहा कैदी जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेत अ‍ॅल्यूमिनियमचे ताट फाडून त्यापासून तयार करण्यात आलेल्या शस्त्राचा वापर वार करण्यासाठी करण्यात आला आहे. कैद्यांमधील हाणामारी रोखण्यास गेलेल्या तुरुंगाधिकाऱ्यांबरोबर काही पोलिसांनाही किरकोळ मार लागला आहे. पाचही कैद्यांविरुध्द ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमक्या कोणत्या कारणामुळे ही हाणामारी झाली, याचा तपास करण्यात येत आहे.

ऑर्थर रोड तुरुंगामध्ये खटला सुरु असलेल्या कैद्यांना ठेवण्यात येते. सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सर्कल क्र. ७ येथे मुदस्सर इस्माईल अन्सारी (३०), सरवर मकसूद खान (३२), सुलेमान महमूद पटेल, गोपाळ बाबू शेट्टी, अरमान नफीस खान या मुस्तफा डोसा टोळीतील गुंडांची नायर टोळीतील विशाल आमकर आणि मुरगन नाडर (५२,) जाकीर बशीर खान, सचिन कणसे, संतोष परब, राजा नायर, सुनील निगेरी अशोककुमार केवट यांच्याशी भांडण झाले. यावेळी कैद्यांना जेवणासाठी देण्यात येणाऱ्या अ‍ॅल्यूमिनिमच्या ताटाला धारदार बनवून तयार करण्यात आलेल्या कापणीच्या मदतीने सरवर मकसूद खान, सुलेमान पटेल यांनी विशाल आमकर आणि मुरुगन नाडर यांच्यावर वार करुन त्यांना जखमी केले. यात मुदस्सर आणि इतर तीन कैदीही जखमी झाले. मारहाण थांबविण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र दोन्ही टोळीतील सदस्य आक्रमक झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तुरुंगाधिकारी ए. एस. पानसरे, हरिश्चंद्र मार्के यांनी शिट्टी वाजवत कैद्यांना मागे सरकण्यास सांगितले. तरीही बेभान झालेले कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी सुरुच होती. अखेर, पोलिसांनी लाठीमार करत दोन्ही गटातील कैद्यांना दूर केले. या संपूर्ण घटनेत तुरुंगाधिकारी पानसरे आणि इतर कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की झाली.

fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक
Fugitive accused in Mephedrone smuggling case is arrested
आईला भेटायला आला अन् जाळ्यात अडकला; मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार आरोपीला अटक

हल्ल्यात आमकर याच्या दोन्ही गाल, छाती, डावी मांडी यांना कापले असून मुरुगनच्या चेहऱ्यावर आणि छातीवर कापल्याच्या खुणा आहेत. तर, हल्लेखोरांपैकी मुदस्सरच्या डोक्यावर जखमा असून त्याने स्वतहूनच मनगटावर वार केल्याचेही कळते. या पाचही जणांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.