चव्हाण यांची मागणी; चुकीची माहिती दिल्याचा आरोप
डाळींच्या साठय़ांवरील र्निबध हटविल्याने चार महिन्यांमध्ये प्रचंड दर वाढून ग्राहकांना सुमारे चार हजार कोटी रुपयांचा फटका बसला आणि व्यापाऱ्यांनी कमावले, असा आरोप करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
अन्य राज्यांनी र्निबध हटविल्याने महाराष्ट्रातही उठविल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. त्याचा इन्कार करीत पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार चव्हाण हे माझ्यावर खोटे आरोप करीत असून योग्य माहिती दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले.
महाराष्ट्रातील र्निबध हटविले तरच डाळींचे दर वाढतील, असा विचार करून ते हटविल्यासा आरोप करून मुख्य सचिवांनीही योग्य प्रकारे जबाबदारीचे पालन न करता प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले