पुणे व नागपूर दरम्यान दिवाळीच्या सुटय़ांमध्ये होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन या मार्गावर वातानुकूलित शिवनेरी बससेवा सुरू करण्याचे एस.टी. महामंडळाने ठरवले आहे.
वातानुकूलित शिवनेरी बससेवा १९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहील. ही बस सायंकाळी ७ वाजता शिवाजीनगर, पुणे येथून सुटेल. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, चिखली, खामगाव, अकोला व अमरावती या मार्गाने ७४४ किलोमीटरचा प्रवास करून ती दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता नागपूरला पोहचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ७ वाजता नागपूरहून सुटणारी ही बस दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पुण्याला पोहचेल. पुणे ते नागपूर या प्रवासाचे भाडे प्रौढांसाठी प्रत्येकी १९५९ रुपये असेल.