बदलापूर व वांगणी दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी उशिरा मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने ऐन गर्दीच्या वेळी दोन तास कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
वांगणी स्थानकाजवळ कर्जतकडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कर्जतकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती. त्यामुळे सायंकाळी ६.५२ ची खोपोली लोकल बदलापूर स्थानकात थांबली होती. यावेळी लोकलमधील महिलांनी गार्डला घेराव घालून खोपोली लोकल रेल्वे प्रशासनाला खोपोलीकडे नेण्यास भाग पाडले. त्यामुळे बदलापुरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.