प्रवासी सुविधांशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी वा सूचना नोंदवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने १३८ ही हेल्पलाइन सुरू केली आहे.
प्रवाशांना सुरक्षेसंबंधी कोणतीही समस्या उद्भवल्यास रेल्वेने भारतभर १८२ हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. तसेच रेल्वेगाडय़ा, पीएनआरशी संबंधित चौकशीसाठी १३९ हा हेल्पलाइन क्रमांकही कार्यरत आहे. याच जोडीला खानपान सेवेतील काही त्रुटी, अस्वच्छता, वैद्यकीय सुविधा, डब्यांची अवस्था आदी तक्रारींसाठी १३८ हा नवा क्रमांक आहे.
या क्रमांकावर तक्रार नोंदवताना प्रवाशांना काही माहितीही विचारली जाईल. त्यात पीएनआर क्रमांक, स्थानकाचे नाव आदी गोष्टींचा तपशील द्यावा लागेल.
संपूर्ण देशभर ही हेल्पलाइन कार्यरत असेल. प्रवाशांच्या तक्रारींची दखल तातडीने घेतली जाणार असून तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे त्या तक्रारी सुपूर्द करण्यात येतील, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.