रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार, २४ सप्टेंबर २०१७ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकचा तपशील पुढीलप्रमाणे-

 मध्य रेल्वे

’कधी : रविवार, २४ सप्टेंबर २०१७, सकाळी ११-२० ते दुपारी ४-२०

’कुठे : ठाणे ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर

’परिणाम : सकाळी १०-४८ ते दुपारी ४-२४ या कालावधीत डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक मुलुंड ते कल्याण मार्गावर डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली या रेल्वे स्थानकांवर डाऊन धिम्या उपनगरी गाडय़ा मेगा ब्लॉकच्या कालावधीत थांबणार नाहीत. येथे जाणाऱ्या प्रवाशाना कल्याण, डोंबिवली व दिवामार्गे प्रवास करता येईल.

 हार्बर मार्ग

’कधी : रविवार, २४ सप्टेंबर २०१७, सकाळी ११-२० ते दुपारी ४-२०

’कुठे : पनवेल ते नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर

’परिणाम : पनवेल, बेलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी (अप) तसेच नेरुळ ते पनवेल, बेलापूरकडे जाणारी (डाऊन) उपनगरी वाहतूक अनुक्रमे सकाळी ११-१४ ते दुपारी ४-१५ आणि सकाळी ११-०१ ते दुपारी ४-२६ या कालावधीत रद्द करण्यात आली आहे. पनवेल ते अंधेरी या मार्गावरील उपनगरी वाहतूकही या कालावधीत रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नेरुळ आणि ठाणे ते नेरुळदरम्यान विशेष उपनगरी गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.

 पश्चिम रेल्वे

’कधी : सकाळी १०-३५ ते दुपारी ३-३५

’कुठे : अंधेरी ते बोरिवलीदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर

’परिणाम : अंधेरी ते बोरिवलीदरम्यान उपनगरी गाडय़ा अप व डाऊन धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार. बोरिवली उपनगरी गाडय़ा बोरिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १, २ आणि ४ वर येतील, तर विरारला जाणाऱ्या गाडय़ा फलाट क्रमांक ३ किंवा ५ वर येतील.