भाजपचे मुख्यमंत्र्यांना साकडे

न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पोलिसांनी गोविंदा पथकाविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्य़ात सदोष मनुष्यवधाचे लावण्यात आलेल्या कलमामुळे भविष्यात तरुण गोिवदाच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे गोविंदा पथकांवर लावलेली गंभीर कलम मागे घ्यावीत. त्यासाठी आवश्यकता भासल्यास महाधिवक्त्यांचे यांचे मत जाणून घ्यावे, असे साकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष  आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना शनिवारी घातले.

शेलार यांनी एका पत्राद्वारे मानवतेच्या दृष्टिकोनातून तरुण गोविंदांना दिलासा देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. ज्या मंडळांनी न्यायालयाचे निर्देश पाळले नाहीत अशांपकी मुंबईत सुमारे २९ मंडळांवर २१ तर ठाण्यात २० मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी गुन्हे दाखल करताना काही गंभीर स्वरूपाची कलमे या  लावली आहेत. कलमे ही तरुण वयात दाखल झाल्यास या तरुण गोविंदांच्या पुढील आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने जनभावना लक्षात घेऊन न्यायालयाच्या अवमानाचे गुन्हे वगळता दाखल करण्यात आलेली गंभीर कलमे सरकारने मागे घ्यावीत, अशी विनंतीही शेलार यांनी केली आहे.

राज ठाकरे आज ठाण्यात

दहीहंडीचा सण उत्साहात साजरा केलेल्या गोविंदा पथक आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे उद्या ठाणे शहरात जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे र्निबध मोडून मनसेने ठाण्यात उत्साहात हा सण साजरा केला होता. या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांचा ठाणे दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या आधीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्याची खेळी भाजपने केली.