शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी सकाळी भेट घेतली आणि त्यांच्याकडे विविध सूचनांचा समावेश असलेला एक प्रस्ताव दिला. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे हे सुद्धा राज ठाकरे यांच्यासमवेत उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी राज ठाकरे यांनी दिलेल्या प्रस्तावात पुढील सूचनांचा समावेश आहे…
१. पुस्तके चाचणीनिहाय विभाजित करा
२. सर्व सहा विषयांचे दर तिमाहीसाठीच्या अभ्यासक्रमाचे एकच पुस्तक करा. अशी वर्षाला चार पुस्तके असतील. यामुळे विद्यार्थ्यांना दररोज सहा पुस्तके नेण्याचा भार सोसावा लागणार नाही. त्याचबरोबर पालकांवर एकदम सर्व पुस्तके खरेदी करण्याचा बोजा पडणार नाही
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सुमारे ४५ मिनिटे झालेल्या या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राज्यातील विविध विषयांबाबत आणि प्रश्नांबाबत चर्चा झाली.