वैद्यकीय व दंतवैद्यक प्रवेशसाठी यंदापासून ‘नीट’ परीक्षा घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यातील हजारो त्रस्त पालक व विद्यार्थ्यांची बाजू मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दूरध्वनीवरून मांडली तर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पालकांच्या वतीने निवेदन सादर करून ‘नीट’ मार्ग काढण्याची विनंती केली.

राज ठाकरे यांनी पालकांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते. आपण या प्रश्नावरून पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून लक्ष घालण्याची विनंती केल्याचे राज यांनी पत्रकारांना सांगितले. या परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे हा देश नक्की चालवतेय कोण, सरकार की न्यायालय, असा प्रश्न निर्माण झाल्याचे राज म्हणाले. या भेटीत राज यांनी राज्यातीराज ठाकरे यांनी पालकांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ल ३३ हजार विहिरींचा मुद्दा तसेच पाणीटंचाईवरही चर्चा केली.