डोंबिवली:  ‘लोकसत्ता’मधील मुद्रित तपासनीस रवींद्र राजाराम लाड (४७) यांचे मंगळवारी सकाळी येथील आयकॉन रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ व बहीण असा परिवार आहे. स्वभावाने मनमिळावू व मितभाषी असलेल्या लाड यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.