माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (१५ ऑक्टोबर) संपूर्ण महाराष्ट्रात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक कार्यालयांनी या दिवशी आपल्या संस्थेत ‘डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा’ निर्माण करावा तसेच एकमेकांना पुस्तके भेट द्यावीत, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी मुंबईत केले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिनेते स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री मुक्ता बर्वे तसेच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी तसेच मििलद कांबळे, अभिराम भडकमकर हे मान्यवर ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. तरुण लेखक व इंग्रजी कादंबरीकार सुदीप नगरकर हे मुंबई येथील विल्सन महाविद्यालय, सोफिया महाविद्यालय, रुपारेल महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. नगर येथील स्नेहालय रेडिओ कम्युनिटी रेडिओवर मंगला नारळीकर, स्वानंद किरकिरे यांच्यासह स्थानिक लेखक सहभागी होणार आहेत. सामाजिक कार्यकत्रे प्रदीप लोखंडे यांची ‘रुरल रिलेशन्स’ ही संस्थादेखील अनेक शाळांमध्ये कार्यक्रम करणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्यासह समिती आणि मंडळाचे सदस्य पुणे, ठाणे, विक्रमगड, वाई, कोल्हापूर, नाशिक बारामती, लातूर, औरंगाबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आपण स्वत: विरार (पूर्व) येथील आचोळे शाळा क्र.१, वसई पश्चिम येथील वर्तक महाविद्यालय आणि मनोरीमधील ज्ञानसाधना विद्यामंदिर शाळेला भेट देणार असून विद्यार्थ्यांना गोष्ट सांगून ‘वाचन’ या विषयावर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ‘वाचन दिन’ फक्त एका दिवसापुरता मर्यादित न राहता वाचनाचा हा उपक्रम निरंतर सुरूच राहावा आणि हा उपक्रम केवळ शासकीय विभागाचा किंवा संस्थांचा न राहता संपूर्ण जनतेचा व्हावा, अशी अपेक्षाही तावडे यांनी व्यक्त केली.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Aditya Thackeray Yavatmal
‘वापरा आणि फेका’ हीच भापजची नीती; महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांची टीका
mahesh manjrekar
“सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट बनवणार”, महेश मांजरेकरांचं वक्तव्य; शिवसेना-मनसेबाबतही केलं भाष्य
Paper leak Examination Malpractices Act Report submitted by Nimbalkar Committee
पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा! निंबाळकर समितीकडून अहवाल सादर