भाडे नाकारल्यावर जाब विचारणाऱ्या एका तरुणीला रिक्षाचालकाने धडा शिकवण्यासाठी अंधेरी येथे न नेता कुर्ला येथे नेले. या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली.
 विमानतळावर काम करणारी ही तरुणी अंधेरीत राहते. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता तिने घरी जाण्यासाठी एक रिक्षाचालकाला विचारले. पण जवळचे भाडे असल्याने रिक्षाचालकाने तिला बसविण्यास नकार दिला.पण ही तरुणी त्याच्या रिक्षात बसली आणि घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर रिक्षा चालकाने तिच्याशी उर्मट भाषेत वाद घातला आणि तिला धडा शिकवण्यासाठी रिक्षा वेगाने चालवायला सुरवात केली. अंधेरीत गस्तीवर पोलीस दिसल्यावर ही तरुणी या पोलिसांकडे आपली तक्रार करेल अशी त्याला भीती वाटली आणि त्यानंतर त्याने रिक्षा कुल्र्याच्या दिशेने नेली.कुल्र्यात त्याने आपल्या नातेवाईकांना बोलावून या तरुणीला अश्लिल भाषेत दमदाटी करण्यास सुरवात केली. या तरुणीने मग या आपल्या कुटुंबियांना तसेच नियंत्रण कक्षाला फोन करून बोलावून घेतले. कुर्ला पोलिसांनी त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या रिक्षाचालकाला अपहरणाच्या गुन्’ाात अटक केली. नंतर न्यायालयाने शुक्रवारी त्याची जामिनावर सुटका केली.
‘रायगड’ला आता जाग येतेय..
‘गावकी’च्या मूठभर पंच मंडळींनी हातमिळवणी करून एखाद्या कुटुंबावर सामाजिक बहिष्काराचा निर्णय जाहीर करायचा, आणि गावकीपुढे गुडघे टेकून क्षमायाचना करेपर्यंत अशा बहिष्कृत कुटुंबाने उपेक्षा, हालअपेष्टा आणि आर्थिक कोंडी सहन करायची.. आता मात्र, चित्र बदलताना दिसते आहे. आता रायगड जिल्ह्यात या प्रथेविरुद्ध आवाज उठू लागला आहे. वर्चस्ववाद झुगारण्याची हिंमतही तेथे जागी होत आहे.. काही बहिष्कृत कुटुंबांशी बातचीत केल्यानंतर जाणवलेल्या वास्तवाचा एक विशेष वृत्तलेख.. रविवारच्या अंकात!