सत्ताधीशांच्या ‘मातृसंस्थे’चा आग्रह

‘इंडिया’ हे ‘भारत’ या नावाचे भाषांतर नाही आणि ‘इंडिया’ या नावाला प्राचीन परंपरा किंवा इतिहासही नाही. त्यामुळे जगाच्या पाठीवर भारत देशाची ओळख ‘इंडिया’ नव्हे, तर केवळ ‘भारत’ अशीच असली पाहिजे, अशी आग्रही भूमिका सत्ताधारी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतली आहे. संघाचे हे संकेत ओळखून आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताची ‘इंडिया’ ही ओळख पुसण्यासाठी मोदी सरकार कोणती पावले उचलणार याकडे संघ परिवाराचे लक्ष लागले आहे.

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
government cutting down of forests
उद्योगांवर कृपादृष्टी, जंगलांवर वक्रदृष्टी!
loksatta editorial on manoj jarange patil controversial statement on devendra fadnavis
अग्रलेख : करेक्ट कार्यक्रम!

भारताचे ‘इंडिया’ हे नाव संघाला मान्य नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर संघ मात्र, ‘इंडिया’ या नावाचा चुकूनही उल्लेख करत नाही. उलट भारत हे या देशाचे नाव या देशाच्या प्राचीन परंपरेशी नाळ जोडणारे आहे. त्यामुळे ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ अशी जागतिक ओळख निर्माण करण्यासाठी आधी देशातील समाजात जागृती करण्यावर भर दिला पाहिजे, हे ओळखून आता जनजागृतीवर भर देण्यासाठी संघात आखणी सुरू असल्याचे परिवारातील वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. संघ ही स्वतंत्र यंत्रणा आहे, ती राज्यव्यवस्थेच्या आधाराने काम करत नाही, त्यामुळे इंडिया हे नाव पुसून देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृतपणे भारत अशी ओळख मिळावी अशी संघाची इच्छा असून त्यासाठी संघ आपल्या पद्धतीने प्रयत्नशील आहे, असे या सूत्रांनी सांगितले. मात्र, यासाठी संघाकडून सरकारकडे कोणतीही मागणी केली जाणार नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे मातृसंस्थेची इच्छा ओळखून आता सत्ताधारी भाजप या मुद्दय़ावर कोणती भूमिका घेणार याकडे निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

बरोबर चार महिन्यांपूर्वी, एप्रिलमध्ये रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात संघाच्या या इच्छेचा जाहीर उच्चार केला होता. भारत हा केवळ जमिनीचा तुकडा नाही, तर ती या देशाची जागतिक पातळीवरील ओळख आहे आणि त्याचा या देशाच्या नागरिकांना अभिमान असलाच पाहिजे, असे मत त्या वेळी भागवत यांनी मांडले होते. भारत या नावाचे इंडिया असे भाषांतर होऊच शकत नाही, असेही त्यांनी परखडपणे सांगितले होते. भारताची इंडिया ही ओळख पुसून भारत अशी ओळख प्रस्थापित करण्यासाठी आधी देशाला शक्तिशाली बनविले पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या पराक्रमाची इथे कमतरता नाही, अशा शब्दांत त्यांनी संघटनेच्या इच्छेचे संकेतही दिले होते. जगाच्या पाठीवर भारत हाच देश वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. भारत ही या देशाच्या परंपरेची ओळख असल्याने संघ मात्र या देशाला भारत असेच म्हणतो, याकडेही या सूत्रांनी लक्ष वेधले.