26 May 2016

सचिन तेंडुलकर आणि नरेंद्र मोदी मातोश्रीवर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काल (सोमवार) रात्री सपत्निक 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

मुंबई | November 20, 2012 2:10 AM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काल (सोमवार) रात्री उशीरा सपत्निक ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी सुमारे अर्धा तास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. अहमदाबाद येथे इंग्लंडविरूध्दता पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर सोमवारी रात्री सचिन मुंबईत दाखल झाला आणि त्याने लगेचच मातोश्रीवर धाव घेतली. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर कसोटी सामना सुरू असल्याने त्याला मुंबईत येणे शक्य झाले नाही. मात्र, सचिनने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोदंवून बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहिली होती.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज (मंगळार) सकाळी ‘मातोश्री’वर येऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली.  

First Published on November 20, 2012 2:10 am

Web Title: sachin tendulkar narendra modi visits on matoshree