विक्रमवीर सचिन तेंडुलकर हा नेहमीच आपल्या नावाला जागला आहे. आता तर त्याने साहित्यविश्वातदेखील विक्रमी पदार्पण केले आहे. सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे‘ या आत्मचरित्रानेही विक्रीचा विक्रम केला आहे.      
भारतात सत्य घटनेवर आधारीत हार्डबॅक पुस्तकांमध्ये सचिनच्या आत्मचरित्राने सर्वाधिक विक्रीची नोंद केली आहे. सचिनच्या पुस्तकासाठी प्रकाशनाआधीच दीड लाख लोकांनी ऑर्डर नोंदविली आहे. सचिनच्या या आत्मचरित्राच्या प्रकाशकांनी ही माहिती दिली आहे. ‘प्लेइंग इट माय वे‘ या आत्मचरित्राचे गुरुवारी प्रकाशन करण्यात आले होते.