संभाजी ब्रिगेडची मागणी; व्यवसायासाठी प्रशिक्षण व अर्थसहाय्य हवे

विदर्भात मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे या समाजाला आíथकदृष्टया सक्षम करण्यासाठी मराठा कुणबी समाजाच्या महिलांना स्वावलंबी करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने या समाजाच्या महिलांना उद्योग व्यवसायाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, शून्य व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देऊन बाजारपेठा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने राज्य शासनाकडे केली आहे.

मराठा समाजाच्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मातोश्री अहिल्याबाई होळकर महामंडळाची शासनाने स्थापना करावी. २०११ ची जनगणना आकडेवारी जाहीर करून सर्वानाच संविधानातील निर्देशनानुसार आरक्षण द्यावे. शासकीय सेवेतील अनुशेष भरण्यात यावा. कच्छ प्रांताच्या पहिल्या महिला अधिकारी कैसर ए. िहद डॉ. रमाबाई राऊत यांच्या नावाने वैद्यकीय सेवा पुरस्कार दिला जावा. वैद्यकीय स्नातकोत्तर पदवी गुणवत्ता यादीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या नावाने पुरस्कार दिला जावा. बहुजन महानायिका, महानायकांच्या इतिहासाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यासाठी सर्व संवर्गातून इतिहासतज्ज्ञ स्त्री-पुरुषांची समिती स्थापन करावी, त्यांनी मान्यता दिलेल्या इतिहासचा पाठय़पुस्तकात समावेश करावा अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने शासनाकडे केली आहे. अशी माहिती मुंबई मराठी पत्रकारसंघात आयोजित पत्रकार परिषदेत जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. छायाताई महाले यांनी दिली.