राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेतील करोडो रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडून करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी विधानसभेत दिली. संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांची ही रक्कम लाटली असून हा गैरव्यवहार सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.